27.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ”घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न
27.01.2026: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन मुंबई येथे करण्यात आले. ‘हाय ऑन कसोल’ या पुस्तकाचे लेखक, पत्रकार व अध्यापक आदित्य कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रेड चिलीज एन्टरटेन्मेण्टच्या व्यवसाय व्यवस्थापिका करुणा बडवाल, संगीतकार संजीव वाधवानी व चित्रपट निर्माते राजन खोसा यांसह मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.