बंद

    26.01.2026 : प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र लोकभवन येथे राष्ट्रध्वज वंदन

    प्रकाशित तारीख : January 26, 2026
    26.01.2026:  प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र लोकभवन येथे राष्ट्रध्वज वंदन

    प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र लोकभवन येथे राष्ट्रध्वज वंदन

    भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज लोकभवन, मुंबई येथे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना दिली.

    लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कार्यरत पोलीस अधिकारी व जवानांनी याप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत गायले.

    राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार हे यावेळी उपस्थित होते.

    77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश आज दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता दूरदर्शन सह्याद्री वहिनी वरुन प्रसारित
    करीत आहेत. आकाशवाणी (अस्मिता वाहिनी) वरुन वर हा संदेश सकाळी 9.00 वा. प्रसारित केला जाईल.

    राज्यपालांचा संदेश खालील लिंक वरुन पाहता येईल.
    https://www.youtube.com/live/Q-ZJbdHgGIY