23.01.2026: नेताजी सुभाषचंद्र बोस; बाळासाहेब ठाकरे यांना लोकभवन येथे अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस; बाळासाहेब ठाकरे यांना लोकभवन येथे अभिवादन
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२३) महाराष्ट्र लोकभवन येथे त्यांनी आदरांजली वाहण्यात आली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी उभय प्रभृतींच्या प्रतिमांना अभिवादन केले.