बंद

    26.12.2025: बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली

    प्रकाशित तारीख : December 26, 2025
    26.12.2024 : राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी 'वीर बाल दिवस' निमित्ताने साहिबजादा जोरावर सिंह व साहिबजादा फतेह सिंह यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेला राजभवन, मुंबई येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली

    वीर बाल दिनानिमित्त शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह जी यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र लोकभवन येथे अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्वप्रथम उभय हुतात्मा बालवीरांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.