बंद

    25.12.2025: अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली

    प्रकाशित तारीख : December 25, 2025
    Lok Bhavan offers tributes to former PM Vajpayee

    अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली

    दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला (दि.२५) पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.