15.12.2025: महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
15.12.2025: राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. 'लोकभवन' येथे महादेवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगती संदर्भात माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे सर्व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक उपस्थित होते.
15.12.2025: Secretary to the Governor of Maharashtra, Dr. Prashant Narnaware, has directed all universities and affiliated colleges to register every player on the Bharat Sports Portal and football teams under the Mahadeva Project. Deputy Secretary to the Governor, S. Ramamoorthy, Joint Director (D.B.) Vikas Kulkarni and the Directors of the Sports Departments of the state universities were present at the meeting.