10.12.2025 : राज्यपालांचे भाषण – सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
10.12.2025 : सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा लोकभवन मुंबई येथे शुभारंभ करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी राज्यपालांच्या जॅकेटला सशस्त्र सेनेच्या ध्वजाचे तिकीट लावले. त्यानंतर राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, जीओसी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ले.जन. डी.एस. कुशवाहा, एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर, सामान्य प्रशासन विभागातील सचिव पंकज कुमार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय आयुक्त, कोकण डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार व आंचल गोयल, विविध देणगीदार संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.