10.12.2025: गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’ संपन्न
10.12.2025: भारतीय नौसेना दिनानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमानंतर आयोजित स्वागत समारंभाला उपस्थित राहून राज्यपालांनी वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. समारंभास नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, नौदलातील वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.