26.11.2025 : संविधान दिनानिमित्त राजभवन मुंबई येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन
26.11.2025 : भारतीय संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.