बंद

    19.11.2025: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख : November 19, 2025
    19.11.2025 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या  १०८ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या खाजगी सचिव अर्चना गायकवाड व  राज्यपालांच्या अवर सचिव (प्रशासन) (प्र.) करुणा वावडणकर यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  दरवर्षी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी उपस्थितांनी देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी  निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ  घेतली.

    दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन

    दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०८ व्या जयंती दिनानिमित्त बुधवारी (दि. १९) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राज्यपालांच्या खाजगी सचिव अर्चना गायकवाड व राज्यपालांच्या अवर सचिव (प्रशासन) (प्र.) करुणा वावडणकर यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते.

    यावेळी उपस्थितांनी देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ घेतली.