16.11.2025: राज्यपालांनी ‘नैसर्गिक कृषी – अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर मार्गदर्शन केले
16.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज ‘नैसर्गिक कृषी – अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर प्रशासकीय, पोलीस व राजस्व तसेच इतर सेवेतील अधिकारी व स्वयंसेवकांशी राजभवन मुंबई येथे संवाद साधला. संकल्प फाउंडेशनच्या वतीने या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा, संकल्प फाउंडेशनचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.