16.11.2025: महाराष्ट्र व पंजाबच्या राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल यांचे पोस्टेज स्टॅम्प व स्मृती मुद्रेचे प्रकाशन
16.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते आज जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील पोस्टेज स्टॅम्प व स्मृती मुद्रेचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जसकरण बोथरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, जसकरण बोथरा फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ बोथरा व इतर मान्यवर उपस्थित होते.