बंद

    13.11.2025 : राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

    प्रकाशित तारीख: November 13, 2025
    राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

    राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

    महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनानुसार राजभवनातील आदरातिथ्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवसांच्या कौशल्य वर्धन प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. १३) राजभवन येथे संपन्न झाला.

    राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सत्रामध्ये शिबिरात सहभागी झालेल्या ६२ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांना खानपान सेवा, गृह व्यवस्थापन व अन्ननिर्मिती या विषयांसंबंधी कार्यानुभवासह प्रशिक्षण देण्यात आले.

    आपल्या भाषणात राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता कौशल्य वर्धन प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. राजभवन ही राज्याचे घटना प्रमुख असलेल्या राज्यपालांची संस्था असून राजभवन येथे देशातील महत्वाची संस्था असून येथे देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच विविध देशांचे राष्ट्रप्रमुख भेट देत असतात. त्यामुळे येथील आदरातिथ्य सर्वोत्कृष्ट असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी डॉ नारनवरे यांच्या हस्ते इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ निशित श्रीवास्तव, संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापिका नीलम नाडकर, प्रा. नंदकुमार गायकवाड, प्रा अमोल बलकवडे व मेधा भट्टाचार्य यांचा सत्कार करण्यात आला.

    राज्यपालांचे परिवारप्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांच्या खासगी सचिव अर्चना गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.