बंद

    न्या. नरेश पाटील यांनी घेतली मुख्य न्यायाधीश पदाची शपथ

    प्रकाशित तारीख: October 29, 2018

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली.

    राजभवन येथे सोमवारी झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपालांनी न्या. पाटील यांना पदाची शपथ दिली.

    सुरुवातीला राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी न्या. नरेश पाटील यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथ ग्रहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    शपथविधीला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवृत्त मुख्य न्यायाधीश मोहित शाह व न्या. जे.एन. पटेल तसेच न्या. नरेश पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    दिनांक १२ ऑगस्ट २०१८ रोजी न्या. पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.