31.10.2025: सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन
सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन
अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ
देशाचे दिवंगत उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. ३१) राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली, तसेच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांजली वाहण्यात आली. श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ही राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळली जाते.
यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.