29.10.2025: पंतप्रधानांनी इंडिया मेरीटाइम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाइम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित केले
29.10.2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडिया मेरीटाइम वीक 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव मुंबई येथे आयोजित इंडिया मेरीटाइम वीक 2025 मधील मेरीटाइम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधानांनी संबोधित केले. बंदर पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि संरक्षण जहाजबांधणी या क्षेत्रांतील धोरणनिर्माते, विचारवंत आणि सागरी तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय बंदरे, जलमार्ग व नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यमंत्री शांतनू ठाकूर, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते.
 
         
         
    