28.10.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील २४ विद्यापीठांच्या कुलगुरुंशी संवाद
 
                                राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील २४ विद्यापीठांच्या कुलगुरुंशी संवाद
राजभवनाला दर तीन महिन्यांनी कार्य अहवाल सादर करण्याची सूचना
१. नवे शैक्षणिक धोरण पूर्ण प्रामाणिकपणे राबविण्याची सूचना
२. जबाबदार नागरिक घडवण्यात विद्यापीठांची भूमिका सर्वात महत्वाची
३. भारतीय ज्ञान प्रणाली लागू करावी
४. विद्यापीठांनी आपले गुणांकन सुधारावे
५. विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रेरित करण्याची सूचना
६. विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण प्राधान्याने द्यावे
७. प्रशासन पारदर्शक व गतिमान करण्याची सूचना
८. वसतिगृह, मेस, स्वच्छतागृहे येथे अधूनमधून पाहणी करावी
९. विद्यापीठांनी स्कुल कनेक्ट कार्यक्रम नेटाने राबवावा    
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृक्श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञान द्यावे, उद्यमशील बनवावे तसेच विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक घडवावे अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंशी या आपल्या पहिल्या वहिल्या संवादात केली.
संवाद सत्राला राज्यातील सर्व २४ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु तसेच निवडक विभागांचे सचिव उपस्थित होते.
विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची पूर्ण प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी तसेच विद्यापीठांचे राष्ट्रीय गुणांकन सुधारावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
महाराष्ट्र हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठांचे गुणांकन घसरत आहे ही चिंतेची बाब आहे असे सांगून विद्यापीठांनी या संदर्भात पावले उचलावी असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठांनी दर तीन महिन्यांना केलेल्या कार्याचा अहवाल राजभवनाला पाठवावा अशी महत्वाची सूचना राज्यपाल देवव्रत यांनी यावेळी कुलगुरुंना केली. अहवालामध्ये विद्यापीठांनी आपल्या अडचणी – समस्या देखील मांडाव्या असे त्यांनी सांगितले.
युवक – विद्यार्थी खेळले नाही, मैदानावर गेले नाही व घाम गाळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग केला नाही तर त्या ऊर्जेचा ते निश्चितच दुरुपयोग करतील असे सांगून विद्यापीठ – महाविद्यालयांनी आपली क्रीडांगणे व इतर क्रीडा सुविधा सुस्थितीत ठेवाव्या, क्रीडा विभाग बळकट करावे तसेच किती विद्यार्थी खेळावयास जातात व क्रीडा सुविधांचा उपयोग करतात या गोष्टींकडे लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले.
सदर माहिती देखील विद्यापीठांनी राजभवनाला पुढील तीन महिन्यात द्यावी अशी त्यांनी सूचना केली.
विद्यापीठांनी महिला व बालकल्याण विभागासोबत कार्य करावे व महिला सशक्तीकरणासाठी विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी आपले प्रशासन सुधारले पाहिजे व ते अधिक स्वच्छ व पारदर्शक केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
देशाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर युवक हीच आपली संपदा आहे. आजचे विद्यार्थी साक्षेपी असून शिक्षक किती अद्ययावत आहेत, ते बोलतात कसे, चालतात कसे, वेळेवर येतात की नाही या सर्व गोष्टी पाहत असल्यामुळे शिक्षकांनी अद्ययावत तसेच वक्तशीर असले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठ – महाविद्यालयांनी आपली वसतिगृहे, भोजन कक्ष, स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत की नाही हे तपासले पाहिजे. आपण हिमाचल प्रदेश येथे राज्यपाल असताना स्वतः विद्यापीठांच्या स्वच्छतागृहांची वाईट दशा पाहिली होती असे सांगून कुलगुरु – अधिकाऱ्यांनी वसतिगृहे – मेस नीट आहेत की नाही, हे पाहावे; अधूनमधून विद्यार्थ्यांसह तेथे भोजन करावे. सर्वच गोष्टी वॉर्डनच्या भरवश्यावर सोडू नये असे राज्यपालांनी सांगितले.
वसतिगृहे ही व्यसनाची केंद्रे होऊ नये याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे व ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. व्यसनाधीनता वाढत आहे. याकरिता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी अधून मधून व्याख्याने – कार्यशाळा आयोजित करून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रयत्न केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या कार्यात आपल्या विद्यार्थ्यांना तसेच रासेयो व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भारतीय ज्ञान प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी शाळांना भेटी देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्यास उच्च शिक्षणातील युवकांचे प्रमाण सध्याच्या २७ टक्क्यांहून वाढेल असे त्यांनी सांगितले.
पदवीनंतर युवक कोणत्या क्षेत्रात जातात याची माहिती विद्यापीठांनी ठेवावी तसेच माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून ठेवावे व त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करावे असे राज्यपालांनी सांगितले.
आपण गुजरात येथील विद्यापीठात स्वतः हाती झाडणी घेऊन सात दिवस स्वच्छता केली आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील आपण अशी भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी कुलगुरूंना सांगितले.
**
राज्यपाल का राज्य के 24 विश्वविद्यालयों के कुलपतियों से संवाद
महाराष्ट्र और गुजरात के राज्यपाल तथा कुलाधिपती आचार्य देवव्रत ने आज राज्य के कृषिेतर (Non-Agricultural) विश्वविद्यालयों के कुलपतियों से दृश्य-श्राव्य माध्यम के ज़रिए संवाद किया।
राज्यपाल ने कहा कि केवल अक्षरज्ञान और डिग्री देना ही विश्वविद्यालयों का कर्तव्य नहीं है, बल्कि विद्यार्थियों को कौशल आधारित शिक्षा देना, उन्हें उद्यमशील बनाना, तथा विकसित भारत 2047 के लक्ष्य की दिशा में उन्हें जिम्मेदार नागरिक बनाना भी विश्वविद्यालयों का परम दायित्व है।
संवाद सत्र में राज्य के सभी 24 कृषिेतर विश्वविद्यालयों के कुलपति तथा कुछ विभागों के सचिव उपस्थित थे।
राज्यपाल ने विश्वविद्यालयों को निर्देश दिए कि—
1.     हर तीन माह में कार्य-अहवाल (प्रगति रिपोर्ट) राजभवन को भेजा जाए।
2.     राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 को पूर्ण निष्ठा और ईमानदारी के साथ लागू किया जाए।
3.     भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System) को शिक्षा व्यवस्था में लागू किया जाए।
4.     विश्वविद्यालयों का राष्ट्रीय रैंकिंग सुधारने के ठोस प्रयास किए जाएं।
5.     छात्रों को खेल-कूद के लिए प्रेरित किया जाए और खेल सुविधाओं को सुदृढ़ किया जाए।
6.     छात्राओं के कौशल विकास और महिला सशक्तिकरण पर विशेष ध्यान दिया जाए।
7.     विश्वविद्यालय प्रशासन को पारदर्शी और गतिशील बनाया जाए।
8.     छात्रावास, भोजनालय और स्वच्छतागृहों की नियमित निरीक्षण किया जाए।
9.     स्कूल-कनेक्ट कार्यक्रम को सक्रियता से चलाया जाए ताकि अधिकाधिक विद्यार्थी उच्च शिक्षा से जुड़ें।
राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र एक शिक्षण में अग्रणी राज्य है, परंतु बढ़ती प्रतिस्पर्धा के बीच विश्वविद्यालयों की रैंकिंग में गिरावट चिंता का विषय है। इस दिशा में ठोस सुधारात्मक कदम उठाने की आवश्यकता है।
उन्होंने कहा कि विश्वविद्यालयों को हर तीन महीने की रिपोर्ट में न केवल अपने कार्यों का विवरण देना चाहिए, बल्कि अपनी कठिनाइयाँ और समस्याएँ भी स्पष्ट रूप से बतानी चाहिए।
राज्यपाल ने कहा—
“यदि युवा खेल के मैदानों में नहीं उतरेंगे, पसीना नहीं बहाएंगे, तो उनकी ऊर्जा गलत दिशा में जाएगी। इसलिए विश्वविद्यालयों और महाविद्यालयों को खेल सुविधाएँ दुरुस्त रखनी चाहिए, क्रीड़ा विभाग को सशक्त बनाना चाहिए और यह भी देखना चाहिए कि कितने विद्यार्थी वास्तव में खेलों में भाग लेते हैं।”
उन्होंने विश्वविद्यालयों से कहा कि वे महिला एवं बालकल्याण विभाग के साथ मिलकर छात्राओं को कौशल शिक्षा दें और प्रशासनिक कार्यों में पारदर्शिता लाएँ।
राज्यपाल ने कहा कि आज के विद्यार्थी अत्यंत जागरूक हैं — वे यह भी देखते हैं कि उनके शिक्षक समय पर आते हैं या नहीं, कैसे बोलते हैं, कैसे व्यवहार करते हैं। इसलिए शिक्षकों को समयानुशासित, अद्यतन और आदर्श आचरण वाला बनना चाहिए।
राज्यपाल ने कुलपतियों को निर्देश दिया कि वे विश्वविद्यालयों के छात्रावासों, भोजनालयों और स्वच्छतागृहों की स्वच्छता और व्यवस्था की नियमित जाँच करें। उन्होंने कहा कि हिमाचल प्रदेश में राज्यपाल रहते हुए उन्होंने विश्वविद्यालयों के शौचालयों की खराब स्थिति देखी थी। इसलिए कुलपति और अधिकारी स्वयं निरीक्षण करें और केवल वार्डनों पर निर्भर न रहें।
राज्यपाल ने यह भी कहा कि छात्रावास नशे की लत का केंद्र न बनें, इसकी ज़िम्मेदारी सभी की है। विश्वविद्यालयों को विद्यार्थियों के लिए व्यसनमुक्ति पर व्याख्यान और कार्यशालाएँ आयोजित करनी चाहिए।
उन्होंने कहा कि विश्वविद्यालय वृक्षारोपण, व्यसनमुक्ति, NSS और NCC गतिविधियों में विद्यार्थियों की भागीदारी सुनिश्चित करें।
राज्यपाल ने यह भी कहा कि विश्वविद्यालयों को स्कूलों में जाकर विद्यार्थियों को उच्च शिक्षा के प्रति प्रेरित करना चाहिए, ताकि उच्च शिक्षा में नामांकन प्रतिशत 27% से बढ़ सके।
उन्होंने कुलपतियों से कहा कि विश्वविद्यालय अपने पूर्व विद्यार्थियों का डेटा और संपर्क बनाए रखें तथा पूर्व छात्र स्नेहमिलन (Alumni Meet) नियमित रूप से आयोजित करें।
राज्यपाल ने बताया कि उन्होंने गुजरात में स्वयं विश्वविद्यालय परिसर में सात दिन तक झाड़ू लगाकर स्वच्छता अभियान चलाया था और महाराष्ट्र के विश्वविद्यालयों में भी वे ऐसे दौरे करेंगे।
 
         
        