27.10.2025 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
 
                                दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली.
देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे आहे. देश भ्रष्टाचार मुक्त झाला तर हे ध्येय अधिक लवकर गाठता येईल. या दृष्टीने प्रत्येकाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशातून केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच राजभवन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दि. २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘सर्तकता: आमची सामूहिक जबाबदारी’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे.
 
         
        