भाषण – 27.10.2025: राज्यपालांच्या हस्ते भारत २४ यावृत्तवाहिनीतर्फे मुंबई येथे आयोजित विकसित भारत लिडरशिप समिट २०२५ चे उदघाटन
27.10.2025: महाराष्ट्रव गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत २४ यावृत्तवाहिनीतर्फे मुंबई येथे आयोजितकेलेल्या विकसित भारत लिडरशिप समिट २०२५ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कारकरण्यात आला. वृत्तवाहिनीचे डॉ. जगदीश चंद्र, मनोज जग्याशी, शशिकांत शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विकसितभारत २०४७ चे उदिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र शासनामार्फत केले जात असलेले कार्य, देशाच्या प्रगतीच्या, जनतेच्या विकासाच्या तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना भारत २४ वाहिन्यांच्यामाध्यमातून सर्वदूर पोहचविण्याचे काम होत असल्याबद्दल राज्यपालांनी वाहिनीच्याकामाचे कौतुक केले.