23.10.2025 : राज्यपालांनी दिली आयएनएस शिक्राला भेट
23.10.2025 : महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आयएनएस शिक्राला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी नौदलातील अधिकारी आणि जवानांशी संवाद साधत राष्ट्रसेवेसाठी त्यांच्या अढळ समर्पणाचे आणि अनुकरणीय कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. राज्यपालांनी नौदल कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आरोग्य, समृद्धी आणि सेवेत सातत्यपूर्ण उत्कृष्टतेसाठी राज्यपालांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह प्रदान करून आपली आदरभावना व्यक्त केली. अभ्यागत पुस्तिकेत राज्यपालांनी आपल्या भावना शब्दबद्ध करत भारतीय नौदलाच्या शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.