15.09.2025 : राज्यपालांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकला भेट

15.09.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पत्नी दर्शना देवी यांचेसह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट देऊन राष्ट्रसेवेकरिता नवउर्जा व प्रेरणा प्राप्त केली. यावेळी स्मारकाच्या विश्वस्तांनी राज्यपालांना सावरकरांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे दाखवली तसेच सावरकरांच्या जीवनावरील साहित्य भेट दिले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.