28.08.2025: राज्यपालांनी घेतले वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व लालबागच्या राजाचे दर्शन

28.08.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री आशिष शेलार यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईचा प्रसिध्द गणेशोत्सव असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.