बंद

    26.08.2025: राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली; चैत्यभूमी व स्वातंत्र्यवीर स्मारक येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: August 26, 2025
    26.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे जाऊन वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार व आमदार अमित साटम यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

    राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली; चैत्यभूमी व स्वातंत्र्यवीर स्मारक येथे अभिवादन

    उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झालेल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. २६) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला.

    त्यानंतर राज्यपालांनी चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन राज्यघटनेच्या शिल्पकारांना पुष्पहार करुन अभिवादन केले. यावेळी भंतेंनी प्रार्थना केली.

    राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे जाऊन वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार व आमदार अमित साटम यांनी राज्यपालांचे स्वागत केले.