29.07.2025: राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारोह संपन्न, राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

29.07.2025: भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील १०६ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. पोलीस अलंकरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांसह पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.