07.07.2025: सरन्यायाधीश न्या. गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट

सरन्यायाधीश न्या. गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्यपालांकडून न्या. भूषण गवई यांचा सत्कार
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई यांचे अभिनंदन केले तसेच पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.