06.07.2025: राज्यपालांची आषाढी एकादशी निमित्त चेंबूर मुंबई येथील श्री शृंगेरी शंकर मठास भेट

06.07.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर मुंबई येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे आयोजित आषाढी एकादशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. सुरुवातीला राज्यपालांनी श्री शृंगेरी शंकर मठ येथील देवी शारदा, श्री गणेश व शंकराचार्य यांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराचे मानद व्यवस्थापक डॉ मुथुकृष्णन, मंदिराचे विश्वस्त मोहन सुब्रमण्यम, जुना हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुबोध आचार्य, डॉ. कुमारस्वामी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती आदी उपस्थित होते.