24.06.2025: राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप

24.06.2025: संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र विधान मंडळ येथे आयोजित दोन दिवसांच्या अंदाज परिषदेच्या अध्यक्ष व सदस्यांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप राज्यपाल सी पी राधाकृष्णन व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन मुंबई येथे संपन्न झाला. समारोप सत्राला राज्यसभेचे उपसभापती डॉ हरिवंश नारायण सिंह, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर तसेच विविध राज्यांच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.