21.06.2025: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपालांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली

21.06.2025: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला. योग प्रशिक्षक रवी दीक्षित व कैवल्यधाम संस्थेचे डॉ गणेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल तसेच उपस्थितांनी योगासने, प्राणायाम व योग क्रिया केल्या.