बंद

    12.06.2025: राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित

    प्रकाशित तारीख: June 16, 2025
    12.06.2025: राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित

    राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ अभय फिरोदिया सन्मानित

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती डॉ अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे डॉ फिरोदिया यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.

    कुमारगुरू इन्स्टिट्यूशन्स, कोईम्बतूर यांनी संस्थापक तथा उद्योगपती डॉ. एन. महालिंगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, उद्योग, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सन २०१४ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.

    यावेळी कुमारगुरु इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष बी के कृष्णराज वानवरायार, उपाध्यक्ष एम मणिकम,कार्याध्यक्ष शंकर वानवरायार, एम बालसुब्रमण्यम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते.