21.05.2025: राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा
21.05.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी (२१ मे) दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांनी यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.
21.05.2025: Governor C P Radhakrishnan read out the Anti Terrorism Pledge to the staff and officers of Raj Bhavan on the occasion of Anti Terrorism Day at Raj Bhavan, Mumbai.Minister of Revenue Chandrashekhar Bawankule accompanied the Governor on the occasion. Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Deputy Secretary S Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and state police read out the oath with the Governor.