14.05.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ सपंन्न

14.05.2025: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचा ४३ वा दीक्षांत समारंभ सर विश्वेश्वरैय्या सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे संपन्न झाला. कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालक मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. या पदवीदान समारंभात विविध अभ्यासक्रमातील एकूण १३७२ स्नातकांना पदवी, १८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी आणि २६ स्नातकांना आचार्य पदवी अशा एकूण १५८० स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत तसेच यावेळी १८ स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते.