21.04.2025 : हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवसानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे भाषण

21.04.2025 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस’ समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राजभवनातर्फे हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिमाचल प्रदेशची लोक संस्कृती दर्शवणाऱ्या नृत्य व लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. राज्यपालांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरणाबद्दल रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कार्यक्रमाला पुडुचेरीचे माजी उपमुख्यमंत्री पेथापेरूमल वेलायुधम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचित एस राममूर्ती, कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच पालिकेच्या संगीत कला अकादमीचे पदाधिकारी उपस्थित होते.