20.04.2025 : राज्यपालांच्या हस्ते ‘यशराज भारती सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान

20.04.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आरोग्यसेवा, शाश्वत विकास व सुशासन या क्षेत्रात कार्य्र करणाऱ्या देशातील तीन संस्थांना तिसरे ‘यशराज भारती सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. छत्तीसगड येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’, शिक्षण क्षेत्रातील ‘प्रथम एजुकेशन फाऊंडेशन’ व राष्ट्रीय सूचना केंद्राने विकसित केलेल्या ‘सर्व्हिसेस प्लस’ प्लॅटफॉर्म यांना यशराज भारती सन्मान जमशेद भाभा सभागृह, एनसीपीए मुंबई येथे देण्यात आले. कार्यक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जी – २० चे शेरपा अमिताभ कांत, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा दीपाली भानुशाली, माजी सनदी अधिकारी व लोकपाल सदस्य डी के जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, यशराज रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष मुंदडा, यशराज भारती सम्मान निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राम चरण, आदी उपस्थित होते.