19.04.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह संपन्न

19.04.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांमधील कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह विद्यापीठाच्या मुंबई येथील मुख्यालयात संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठातील प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, शिक्षक व बिगर शिक्षक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला तसेच नवीन कल्पकता स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, कौशल्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, कौशल्य विकास आयुक्त नितीन पाटील, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक माधुरी सरदेशकर, मुंबईतील जपानचे कॉन्सुल जनरल यागी कोजी, माजी कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.