14.04.2025: राज्यपालांचे चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन

14.04.2025: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना करण्यात आली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसह भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्यावरील छायाचित्रांचा प्रदर्शनाला भेट दिली, भीमज्योतीला वंदन केले तसेच उपस्थित भिक्खूंना चिवरदान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, चैत्यभूमी स्मारक समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, भाई गिरकर, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह इतर अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.