14.04.2025: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी (दि. १४) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.