09.04.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस मुंबई येथे संपन्न

09.04.2025 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA), मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना आदिती भागवत यांच्या ‘लय की कहानी’ या नृत्याधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाजसेविका व कला इतिहासकार फिरोजा गोदरेज, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स राहुल बर्हत, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू पृथियानी, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, आयसीसीआर शिष्यवृत्ती प्राप्त विविध देशांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.