09.04.2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरस्थ उपस्थितीत तसेच राज्यपालांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ सपंन्न

09.04.2025 : ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवकार महामंत्र जप सामूहिक पठणामध्ये सहभाग घेतला तसेच मुंबईसह जगभरातील जैन बांधवांना विज्ञान भवन नवी दिल्ली येथून संबोधित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एनएससीआय डोम वरळी, मुंबई येथे ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विश्व नवकार महामंत्र दिनाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ‘जिटो’ या संस्थेतर्फे करण्यात आले होते. मुंबईतील कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) चे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रतिनिधी, जैन साधु, साध्वी आणि निमंत्रित उपस्थित होते.