09.04.2025: मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत विश्वनवकार महामंत्र दिवस संपन्न

पंतप्रधानांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचेआयोजन’; विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत विश्वनवकार महामंत्र दिवस संपन्न
‘विश्व नवकार महामंत्र’ दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ९) विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आले. जगातील अनेक देशात आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी यावेळी संबोधितकेले.
तर, मुंबईयेथे ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ महाराष्ट्राचे राज्यपालसी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम वरळी, मुंबई येथे सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातूनसाजरा करण्यात आला. आपल्याभाषणातून पंतप्रधानांनी देशवासियांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले.
पाण्याचाप्रत्येक थेम्ब वाचवा, आईच्या नावाने एक वृक्ष लावा, स्वच्छता पाळा,स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करा, देशातीलविविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्या, सेंद्रिय शेतीलाचालना द्यावी, निरामय जीवनशैली अंगीकारावी, श्रीअन्नाचा अधिक वापर करावा, योग आणि क्रीडा यांनाजीवनात स्थान द्यावे तसेच गोर-गरिबांना मदत करावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनीयावेळी केले. मुंबईत आयोजितकार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी नवकार महामंत्र हा केवळ शब्द -अक्षरांचा समूह नसून तो अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू आदी ज्ञानी आत्म्यांचा सन्मान करणारा प्रभावी मंत्रअसल्याचे सांगितले.
नवकारमहामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणिसंघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
मुंबईतील कार्यक्रमालाराज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गच्छाधीपती नित्यानंद सुरी, आचार्य के सीमहाराज, आचार्य नय पद्मसागर जी महाराज, मुनी विनम्र सागर जी, आचार्य डॉ. लोकेश मुनी,अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी महाथेरो, जैनइंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) चे पदाधिकारी, जैनसमाजाचे प्रतिनिधी, जैन साधु, साध्वी आदीउपस्थित होते.
विश्वनवकार महामंत्र दिनाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ‘जिटो’ या संस्थेतर्फे करण्यात आले होते.