07.04.2025 : सिडनी इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल्स अँड बिझनेस नेटवर्किंग ग्रुप इंक या ऑस्ट्रेलियन व्यापार आणि गुंतवणूक शिष्टमंडळातील सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
08.04.2025 : सिडनी इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल्स अँड बिझनेस नेटवर्किंग ग्रुप इंक या ऑस्ट्रेलियन व्यापार आणि गुंतवणूक शिष्टमंडळातील सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. शिष्टमंडळाने महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध धोरणात्मक व्यापार आणि गुंतवणूक संधींबाबत चर्चा केली. सिडनी इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल्स अँड बिझनेस नेटवर्किंग ग्रुप महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवणे, आर्थिक भागीदारी मजबूत करणे आणि महत्त्वाच्या गुंतवणूक संधी शोधण्यावर कार्य करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले. बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उप वाणिज्यदूत यान सिंक्लेअर, सिडनी इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल्स अँड बिझनेस नेटवर्किंग ग्रुपचे अध्यक्ष रमण भल्ला, कॅपटेक २०२५ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारा मॉर्गन आणि सिडनी इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल्स अँड बिझनेस नेटवर्किंग ग्रुप इंकचे सदस्य उपस्थित होते.
08.04.2025 : Members of the Sydney Investors Professionals And Business Networking Group Inc, an Australian Trade and Investment delegation met the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. The Group discussed various strategic trade and investment opportunities between Maharashtra and Australia. The Sydney Group is focussing on enhancing bilateral trade, fostering economic partnerships and looking for key investment opportunities in Maharashtra and other States. Yann Sinclair, Australian Vice Consul in Mumbai, Raman Bhalla, President, Sydney Investors Professional Business Networking Group, Sarah Morgan, CEO, CapTech 2025 and members of SIPBNG Inc were present.