04.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

04.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) बारावा दीक्षांत समारोह रजत जयंती सभागृह, नागपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, माफसुचे कुलगुरु डॉ नितीन पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन., कुलसचिव मोना ठाकूर, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक तसेच निमंत्रित उपस्थित होते. या दीक्षांत समारंभामध्ये ७०३ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर ३९ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.