बंद

    26.02.2025 : फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: February 26, 2025
    26.02.2025 : फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

    फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

    टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    टेक स्टार्ट अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्राला भारतातील टेक स्टार्टअप्ससाठी पहिल्या पसंतीचे राज्य बनवण्यासाठीच्या विविध संकल्पनांवर यावेळी चर्चा झाली.

    यावेळी ध्रुविल संघवी, अभिनंदन, अनुपम मित्तल, नैय्या सग्गी, नीरज रॉय, आनंद जैन, शरद संघी, आशिष शाह, त्रिविक्रमण थंपी, नितीश मित्रसेन, पुष्कर मुकेवार, भाविक वासा, ऋषी गुप्ता, मयंक कुमार, दिपक खुराणा आणि अनिकेत देब आदी एंजेल इन्व्हेस्टर्स आणि टेक उद्योजक उपस्थित होते.