24.02.2025 : राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. एकूण १३९२१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. अशोक कोळस्कर यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले. कार्यक्रमाला यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे, प्र.कुलगुरु डॉ जोगेंद्र सिंह बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, स्नातक व निमंत्रित उपस्थित होते.