22.02.2025: ‘जागर संविधान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सचिव श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते.