10.02.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त जपानच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासातर्फे आयोजित स्वागत समारंभ संपन्न

10.02.2025: जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त जपानच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासातर्फे आयोजित स्वागत समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.