07.02.2025: राज्यपालांनी नाशिक येथे गंगा गोदावरी महा आरती केली तसेच राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान केले

07.02.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज श्री गौतमी गंगा गोदावरी नदी प्रकट दिनानिमित्त नाशिक येथे श्री गंगा गोदावरी महा आरतीला उपस्थित राहून गोदावरी पूजन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री महेश शर्मा यांना शिवगंगा अभियानाच्या माध्यमातून ७०० गावांना जल स्वयंपूर्ण केल्याबद्दल राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोदावरी महाआरती तसेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिकतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री डॉ माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आ. सीमाताई हिरे, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.