05.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ

05.02.2025: अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी व उद्यान मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, डॉ. पंकृविचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, इतर कृषी विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात एकूण ३३६० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. दीक्षांत समारंभात २३ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, १३ रौप्य, १८ रोख बक्षिसे व पदके प्रदान करण्यात आली. यावेळी उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, यांना देखील सन्मानित करण्यात आले.