02.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

02.02.2025: भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याण महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाला. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांसह अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्याला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार चैनसुख संचेती, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप गांधी व आयोजन समितीचे निमंत्रक हितेंद्र मोटा उपस्थित होते.