01.02.2025: नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपालांची शाबासकी
01.02.2025: नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली. राज्यपालांनी एनसीसीच्या विविध जिल्ह्यांमधील प्रशिक्षकांचा सत्कार केला, जिंकून आणलेल्या चषकांची पाहणी केली व विजयी कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी झालेले राज्यातील १२४ कॅडेट्स, प्रशिक्षक, तसेच महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांनी राज्यपालांचे स्वागत केले, तर कर्नल एम डी मुथप्पा यांनी प्रजासत्ताक दिन कॅडेट्स निवडप्रक्रिया व शिबीराच्या पूर्वतयारीची माहिती दिली.