30.01.2025: हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
30.01.2025: हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.
30.01.2025: A 2 - minute silence was observed by Governor C P Radhakrishnan as a mark of respect to the martyrs who laid down their lives for the country, at Raj Bhavan, Mumbai. Every year 30 January is observed as Martyrs’ Day in memory of the martyrs who laid down their life for India’s freedom. Principal Secretary to the Governor Pravin Darade, Secretary to the Governor Shweta Singhal, Officers and staff of Raj Bhavan, public works department and police personnel were present to pay their tribute to the martyrs.